पुणे : राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर पुण्यात नेमणूक झालेल्या उपायुक्तांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यानुसार परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांची वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग पोलीस दलातून शहरात आलेले ऋषीकेश रावले यांची परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिंमत जाधव यांची वाहतूक शाखेत बदली झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून आलेले सोमय मुंडे यांची परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
विशेष शाखेतील (स्पेशल सेल) पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांची परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातील उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य राखीव पोलीस दलातून बदलून आलेल्या राजलक्ष्मी शिवणकर यांची पोलीस मुख्यालयात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.