पिंपरी : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील नाराजांनी उदयास आणलेल्या मावळ ‘पॅटर्न’मुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत १,३१,९५६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. ३४.१७ टक्के मतदान झाले आहे. दुपारपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान मावळमध्ये झाले आहे.

महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना त्यांच्याच पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी अपक्ष आव्हान दिले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीनेही भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळातील लढत चुरशीची होत असून मावळ ‘पॅटर्न’ यशस्वी करण्याचे सर्वपक्षीयांपुढे आव्हान आहे. भेगडे यांच्यापेक्षा मावळ भाजपचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मावळकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar On Delhi Election Result
Rohit Pawar : “…तर भाजपाच्या २० जागाही आल्या नसत्या”, रोहित पवारांची दिल्लीच्या निकालावर सूचक प्रतिक्रिया
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती

हेही वाचा – चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल

मावळ विधानसभा मतदारसंघाचा बहुतेक भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दर्‍यांचा दुर्गम असा आहे. तरीही शहरातील मतदारसंघाच्या तुलनेत मावळमधील मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत. या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान २००९ मध्ये झाले होते. तेही ६५.४१ टक्के इतके होते. मावळ मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये ७१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. आता किती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – चुरशीची लढत असलेल्या भोसरीत पहिल्या चार तासात किती मतदान?

मावळमध्ये एकूण ३,८६,१७२ मतदार आहेत. पुरुष मतदार १,९७,४३६, महिला मतदार १,८८,७२३ तर तृतीयपंथी १३ मतदार आहेत. त्यापैकी १,३१,९५६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. ३४.१७ टक्के मतदान झाले आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

Story img Loader