पुणे : घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी खराडी भागातील एका महिलेची १२ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला चोरट्यांनी महिलेला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यामुळे महिलेच्या विश्वास बसला. महिलेला चोरट्यांनी आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १२ लाख ६३ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. महिलेने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत.