पुणे : सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराजवळ असलेल्या एका दुचाकी विक्री दालनात गुरुवारी सकाळी आग लागून २० ते २५ दुचाकी जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली. नवशा मारुती मंदिराजवळ टीव्हीएस शोरुम दुचाकी विक्री दालन आहे. गुरुवारी (५ ऑक्टोबर) सकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकी विक्री दालनात आग लागली.

हेही वाचा : पुणे: माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही क्षणात आग भडकली. दुचाकी विक्री दालनातील २० ते २५ दुचाकींना झळ पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्धा तासात आग आटोक्यात आणली. आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.