पुणे : हडपसर भागातील रामटेकडीत एकाने ठेकेदाराचे डंपर आणि जेसीबी यंत्र पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिस्तोलसिंग ईश्वरसिंग कल्याणी (वय ३४, रा. गंधर्व सोसायटी, भोसले गार्डन, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कल्याणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामटेकडी भागातील नवीन एसआरए वसाहत परिसरातील एका इमारतीसमोर पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कल्याणी ठेकेदार आहेत.

हेही वाचा : घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पकडले; चार गुन्हे उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसआरए वसाहतीसमोर कल्याणी यांनी जेसीबी यंत्र आणि डंपर लावला होता. पहाटे तीनच्या सुमारास एक जण चेहरा कापडाने झाकून तेथे आला. त्याने परिधान केलेल्या जर्कीनमध्ये पेट्रोलचा कॅन ठेवला होता. त्याच्य हातात काठी होती. कल्याणी यांचा डंपर आणि जेसीबी यंत्रावर त्याने पेट्रोल ओतले. डंपर आणि जेसीबी यंत्र पेटवून देऊन आराेपी पसार झाला. पसार झालेल्या आरोपीची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत.