पुणे शहरातील भवानी पेठेतील एका शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीवर १९ वर्षीय तरुणाने १५ ऑगस्ट रोजी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपी तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली.

देवराज पदम आग्री (वय १९) असे आरोपी तरुणांचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवराज पदम आग्री आणि पीडित मुलगी हे दोघेही भवानी पेठेतील एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत. या दोघांची ओळख असून १५ ऑगस्ट रोजी शाळेच्या दुसर्‍या मजल्यावर पीडित मुलगी बॅग घेण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी मुलगा हा स्वच्छतागृह जवळ लपून बसला होता. त्या ठिकाणी पीडित मुलगी येताच तिचा हात पकडून स्वच्छतागृहामध्ये घेऊन गेला. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले. त्यावेळी पीडित मुलाने आरोपीला धक्का देऊन तेथून पळ काढला.

हे ही वाचा… समाजमाध्यमातील ओळखीतून युवतीवर बलात्कार

हे ही वाचा… विधानसभेसाठी २५ जागांची संभाजी ब्रिगेडची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण घटनेची माहिती पीडित मुलीने आईला सांगितली. या प्रकरणी पिडीत मुलीने आमच्याकडे फिर्यादी देताच आरोपी देवराज पदम आग्री याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.