पुणे : शहरातील विविध व्यायामशाळांमध्ये ( जिम) व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगल्याप्रकारे व्हावी या उद्देशाने स्टेरॉईड इंजेक्शन मेफेटर्मिन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर १४ स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर ( वय ३२, रा.खडकी) आणि साजन अण्णा जाधव (वय २५, रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार तेजस रमेश चोपडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे.

हेही वाचा : पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित आरोपी हे नरवीर तानाजी वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोटारीमध्ये बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींकडे औषधे बिल नसताना औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहिती असतानाही संबंधित औषधे अवैधरीत्या प्राप्त करून गैरवापर करण्याचे उद्देशाने जवळ बाळगल्याचे दिसून आले. संबंधित इंजेक्शन त्यांनी कोठून आणले, ते कोणाला विक्री करणार होते, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.