scorecardresearch

Premium

‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका…’ पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अनोखी पुणेरी पाटी

गुलालाने माखलेला रीलस्टार अथर्व सुदामे त्याच्या पवन वाघुलकर,डॅनी पंडित व इतर मित्रांसह मिरवणुकीत सहभागी झाला.

pune ganesh visarjan, puneri pati at ganesh visarjan, reel star atharva sudame in visarjan, atharva sudame puneri pati
'ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका…' पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अनोखी पुणेरी पाटी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : सध्याचे दिवस रील्सचे आहेत. अनेक तरुण मनोरंजक रिल्स करत असतात. मराठी रिल्स करणाऱ्यांमध्ये पुण्यातील अथर्व सुदामे रिल सेलिब्रेटी आहे. अथर्वने अनेक मनोरंजक रिल्स करून नेटकऱ्यांची दाद मिळवली आहे. पुण्यात सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत अथर्व सुदामे त्याच्या मित्रांबरोबर सहभागी झाला, इतकेच नाही तर त्याने पुणेरी शैलीत अनोखा संदेशही दिला.

हेही वाचा : विसर्जन मिरवणुकीत मनमोहक रांगोळी, ढोलताशांचे वादन, पालकमंत्री दुचाकीवरून पोहोचले मंडईत

Anna Mara Ganesh Visarjan Rally
इटलीच्या तरुणीने गाजवली गणेश विसर्जन मिरवणूक; मर्दानी खेळ करत जिंकली पुणेकरांची मनं
gaur-gopal-das-piyush
गौर गोपाल दास यांना दीक्षा घेण्याआधी आवरता आला नाही ‘पीयूष’ प्यायचा मोह; जाणून घ्या ‘पीयूष’ या पेयाचा इतिहास
Famous Ganpati Mandal in Pune
Ganesh Chaturthi 2023 : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे महत्त्व आणि इतिहास, जाणून घ्या; कसे घ्याल दर्शन?
amala akkineni
नागार्जुन यांच्या दुसऱ्या पत्नीने केलंय अनेक सुपरहिट चित्रपटांत काम, कोलकात्यात जन्मलेल्या अमाला कशा झाल्या तेलुगू कुटुंबाच्या सून? वाचा

गुलालची उधळण करत गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. गुलालाने माखलेला रीलस्टार अथर्व सुदामे त्याच्या पवन वाघुलकर,डॅनी पंडित व इतर मित्रांसह मिरवणुकीत सहभागी झाला. या वेळी ‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका’ अशी पुणेरी पाटी हातात घेऊन रिल्सस्टार पवन वाघुलकरने खास पुणेरी शैलीत संदेशही दिला. पवन व अथर्व यांच्या पुणेरी पाटीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune ganesh visarjan reel star atharva sudame and pavan waghulkar flashes puneri pati about dance pune print news ccp 14 css

First published on: 28-09-2023 at 16:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×