पुणे : प्रसिद्ध फॅशन डिझाइनर निवेदिता साबू यांच्या कल्याणीनगरमधील शोरूमचे लॉक तोडून रोख रक्कमेसह दोन लाखांचा ऐवज चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने रांजणगाव येथून अटक केली. अटक आरोपी हे उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विवेक उर्फ गुरुदेव मणीराम राजपुत (वय ३० सध्या रा. रांजणगाव, मुळ रा. मैनपुर, उत्तर प्रदेश), अभिषेकसिंग उर्फ प्रदिप पप्पुसिंग (वय २५, कानपुर, उत्तर प्रदेश), अमितसिंग विजयसिंग (वय ३१, बांधा, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ७ ऑगस्ट राेजी कल्याणीनगर भागात ही घटना घडली होती. याबाबत एकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होते.

हेही वाचा : Eknath Shidne: “विरोधकांनो, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो…”, एकनाथ शिंदे म्हणाले, “अनेकांना पुरुन…”

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, डिझाइनर साबू यांचे कल्याणीनगर येथे वस्त्रदालन आहे. चोरट्यांनी दालनाचे कुलूप तोडून १ लाख ९९ हजारांचे महागडे शर्ट चोरून नेले होते. गुन्ह्याचा समांतर तपास युनिट चारकडून सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी रांजणगाव येथे असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी हे रांजणगावमधील संकल्प सिटी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून रोकड, चोरीचे शर्ट, दुचाकी असा एक लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयदीप पाटील, वैभव मगदुम, स्वप्नील पाटील, अंमलदार हरिष मोरे, प्रविण भालचिम, विशाल इथापे, मनोज सांगळे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा : पुण्यातील बालेवाडीत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला अशी जमवण्यात आली गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त ते रांजणगाव येथे वास्तव्यास आहेत. कल्याणीनगर येथे ते फिरायला आले होते. त्यावेळी वस्त्रदालनातील दिवे सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी वस्त्रदालनाचे कुलुप तोडून रोकड आणि शर्ट चोरून नेले.