पुणे : ज्येष्ठ महिलेला लिंबू सरबतातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना कोथरुड भागात घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सोनाली नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला दांडेकर पूल भागात राहायला आहेत. त्या २७ सप्टेंबर रोजी कोथरुड भागातील मिर्च मसाला हाॅटेलसमोरुन निघाल्या होत्या. त्यावेळी एका महिलेने त्यांना थांबविले. तुम्हाला काम मिळवून देते, असे तिने सांगितले. त्यानंतर तिने ज्येष्ठ महिलेशी ओळख वाढविली. त्यांना लिंबू सरबत पिण्यास दिले. लिंबू सरबतात गुंगीचे ओैषध टाकल्याने महिलेला गुंगी आली. त्यानंतर तिने महिलेला तिने दुचाकीवरुन हडपसर भागात नेले. महिलेकडील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल संच असा एक लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन महिला पसार झाली.

हे ही वाचा…स्वबळाचा विसर पडलेली ‘आरपीआय’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेला हडपसर परिसरातील भेकराईनगर परिसरात सोडून ती पसार झाली. गुंगी उतरल्यानंतर महिलेने परिसरातील नागरिकांकडे विचारणा केली. तेव्हा ती हडपसर भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर महिलेने या घटनेची माहिती कुटुबीयांनी दिली. महिलेने रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर तिने पोलिसांकडे नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. ज्येष्ठ महिलेची लूट करुन पसार झालेल्या महिलेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत. बिबवेवाडी भागात महिलांना काम मिळवून देण्याच्या आमिषाने त्यांना लुटणाऱ्या एका महिलेला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. या महिलेने काम मिळवून देण्याच्या आमिषाने महिलांना चहा, सरबतातून गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटले होते.