छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आजपासून आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी राजे यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेतून यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवता येतो. यापैकी काही प्रश्नं ही केंद्र सरकारच्या हातात आहे, त्यामुळे पुन्हा केंद्राकडे भूमिका मांडणं गरजेचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मंत्री जयंत पाटील हे परिसंवाद यात्रेनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आज माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अनेक आरोप केल्याशिवाय लोक लक्ष देत नाहीत. मोठ्या माणसांची नाव घेतल्याशिवाय बातम्या तयार होत नाहीत. येणाऱ्या जिल्हा परिषदा, महानगर पालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत नागरिकांना विचलित करायचं. मध्यप्रदेश, पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणूकापासून लोकांच लक्ष विचलित करायचं वेगवेगळ्या लोकांना अटकेत टाकायचं, असे प्रकार सध्या चालू आहेत,” असं पाटील म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil slams kirit somayya kjp 91 hrc
First published on: 26-02-2022 at 13:05 IST