किसानपुत्र आंदोलनाचे चिंतन शिबिर १४ व १५ जानेवारी रोजी सेवाग्राम (वर्धा) येथे होणार आहे. या शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेळ्या जिल्ह्यांतून ६० प्रमुख किसानपुत्र भाग घेणार आहेत, अशी माहिती अमर हबीब यांनी दिली.अमर हबीब म्हणाले,की शेतकरीविरोधी सिलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे कायदे रद्द व्हावेत, या साठी गेली सात वर्षे किसानपुत्र आंदोलन कार्य करीत आहे. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नसून, हे एक आंदोलन आहे.

हेही वाचा >>>पुणे: भूसंपादनाअभावी वाकड-बालेवाडी पुलाचे काम रखडले

सेवाग्रामच्या शिबिरात ‘मोदी सरकार शेतकऱ्यांचे कैवारी की मारेकरी?’, ‘निवडणूक सुधारणा’, ‘शेतकरी आणि कर’ व ‘किसानपुत्र आंदोलनाची आगामी दिशा’, या चार विषयांवर डॉ. राजीव बसर्गेकर (नवी मुंबई), अमर हबीब (अंबाजोगाई), अमीत सिंग (पुणे) व ॲड. भूषण पाटील (औरंगाबाद) हे विचार मांडतील.या शिबिरात ‘किसानपुत्रांच्या कविता’ या नावाने कवी संमेलन होणार असून, त्यात संदीप धावडे (वर्धा), नितीन राठोड (पुणे), सुभाष कच्छवे (परभणी), विश्वास सूर्यवंशी (पुणे) व शैलजा आंबेकर (परभणी) भाग घेतील.

हेही वाचा >>>पुणे: मालमत्ता विवरणपत्र देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९ मार्च उपवास, पदयात्रा
साहेबराव करपे यांच्या कुटुंबाने १९ मार्च १९८६ रोजी सामूहिक आत्महत्या केली होती. त्यानंतर सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१७ पासून १९ मार्च रोजी सामूहिक उपवास करून करपे कुटुंबीयांना अभिवादन केले जाते. आत्महत्या थांबविण्याचा संकल्प केला जातो. यंदाचा १९ मार्चच्या उपवासाचा मुख्य कार्यक्रम धुळे येथे होणार आहे. त्या पूर्वी १२ मार्च रोजी किनगाव येथे कडू आप्पा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा होईल. १३ मेपासून पदयात्रा सुरू होईल, ती १९ मार्च रोजी धुळ्याला पोहोचेल. तेथे दुपारी तीन ते पाच या वेळात सभा होईल. सभेला शेतकरी नेते व किसानपुत्र सहभागी होतील, अशी माहितीही हबीब यांनी दिली.