पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळांमध्ये असतात. मतदानासाठीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२०४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळांतील बहुसंख्य शिक्षकांना निवडणुकीच्या काम करावे लागत असल्याने शाळेत शैक्षणिक कामकाज होऊ शकत नाही. तसेच काही ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र असते. त्यामुळे त्या ठिकाणीही पूर्वतयारी करावी लागते. ही बाब लक्षात घेता शाळा बंद ठेवाव्या लागू शकतात. त्यामुळे शाळांना सुटी देण्याचा निर्णय योग्य ठरतो. या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे उचित ठरेल. मात्र, सरसकट सुटी देणेही योग्य ठरणार नाही, असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले.