पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. योगेश रामसिंग गुसिंगे (वय १९, रा. बोरसर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर), संजय सुलाने (वय १९, गोकुळवाडी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), योगेश सुर्यभान जाधव (वय २५, रा. पैठण, छत्रपती संभाजीनगर), लखन उदयसिंग नायमने (वय २१, रा. कात्राबाद छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार; गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित

हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात का घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अंकुश कुंभार यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १९ भरती प्रक्रियासाठी लेखी परीक्षा वडगाव बुद्रुक भागातील केंद्रावर घेण्यात आली. त्यावेळी आरोपींनी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर केल्याचे दिसून आले. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चौघाजणांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करत आहेत.