शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांनी पक्षकारांशी संवाद साधला. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालायच्या सभागृहात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक, कौटुंबिक न्यायालायचे प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा , न्यायाधीश मनीषा काळे, कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्ष ॲड. वैशाली चांदणे, माईंड पाॅवर ट्रेनर या संस्थेचे डाॅ. दत्ता कोहिनकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: मेट्रो प्रकल्पाजवळील जागेत गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची सव्वाकोटींची फसवणूक

गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणावरुन दाम्पत्यात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाचा व्याप तसेच धावपळीमुळे ताणतणावाला सामाेरे जावे लागते. त्यामुळे सहनशीलता कमी होत चालली आहे. किरकोळ वादातून दाम्पत्यातील वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. त्यामुळे दाम्पत्याने एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. संसार सुरळीत ठेवण्यासाठी एकमेकांना समजावून घेणे गरजेच आहे, असे प्रमुख जिल्हा न्यायधीश श्याम चांडक यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; घोरपडे पेठेतील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी डाॅ. दत्ता कोहिनकर यांनी पक्षकारांशी संवाद साधला. अहंकाराला बाजूला ठेवून प्रत्येकाने एकमेकांना समाजवून घ्यायला हवे. एकमेकांचे गुणदोष स्वीकारायला हवे. मुलांच्या भवितव्याचा विचार करायला हवा, असे डाॅ. कोहिनकर यांनी नमूद केले. किरकाेळ वाद झाल्यास थेट न्यायालयात जाणे योग्य नाही. एकमेकांना माफ करुन संसाराचा गाडा हाकायला हवा, असे आवाहन न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी केले.
ॲड. वैशाली चांदणे यांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले. ॲड. विजय सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अजय डोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.