लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुण्यनगरीतील गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मानाच्या पाच गणपती मंडळांसह कसबा मतदारसंघातील इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात रस्ते दुरुस्ती, स्वच्छतागृहांची सफाई, सांडपाणी वाहिन्यांची सफाई, झाडांच्या फांद्यांची छाटणी या कामांची पाहणी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकरांनी यांनी रविवारी केली. कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.

आणखी वाचा-प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त उद्या पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत बदल… जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्सवात कसबा भागात भाविकांची गर्दी होते.त्यासाठी त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच मंडळांना अडचण येऊ नये असे धंगेकर यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली. प्रलंबित कामांचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी पथ विभाग , आरोग्य विभाग आणि मल:निस्सारण विभाग, विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.