पुणे : शहरात पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावण्याचे प्रकार वाढीले आहेत. वडगाव शेरी, खराडी भागात घडल्या. वडगाव शेरी भागात पादचाऱ्याकडील मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत मनोहर कुलकर्णी (वय ४६, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलकर्णी वडगाव शेरीतील साईनाथनगर परिसरातून निघाले होते. त्या वेळी जुन्या मुंढवा रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी कुलकर्णी यांच्याकडील आठ हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक फौजदार सोनवणे तपास करत आहेत.

हेही वाचा: ‘भाज्यपाल हटावो, महाराष्ट्र बचावो’, पुण्यात डमी राज्यपाल आणत राष्ट्रवादीचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराडी भागातील थिटे वस्ती परिसरात एका पादचाऱ्याचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत रमेश राठोड (वय ३०, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड थिटे वस्ती परिसरातील पेट्रोल पंपाजवळून निघाले हाेते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक फौजदार गायकवाड तपास करत आहेत.