पुणे : दारुच्या नशेत मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद नसीम उर्फ समीर सईदुल्लाह अन्सारी (वय ३७) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कमल रोहित धुव्र (वय १९, रा. अमानोरा पार्कमागे, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल वाहीद हमीद अन्सारी (वय ४०, रा. अमानोरा पार्कमागे, हडपसर) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी आणि धुव्र बांधकाम मजूर आहेत.
हेही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरण : ‘या’ कारणामुळे अटकेत असलेल्या वकिलाकडून सरकारी वकिलाला मारहाण
मोहम्मद आमि कमल कोंढव्यातील येवलेवाडीत नियोजित इमारतीच्या परिसरात दारू पित होते. दारुच्या नशेत कमलने मोहम्मद याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.