लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: ‘एकच भूल कमळ का फूल, देशाला केले एप्रिल फूल’ अशी घोषणाबाजी करत आणि आठ वर्षे ‘अच्छे दिन’च्या भुलथापा देऊन भाजपने जनतेला ‘एप्रिल फूल’ केल्याचा आरोप करत एक एप्रिल हा ‘एप्रिल फूल’ दिवस भाजपच्या खोट्या विकासाचा वाढदिवस म्हणून राष्ट्रवादीने साजरा केला. एकच भूल…कमल का फूल…मोदीजींनी केले सर्वांना एप्रिल फूल… असा मजकूर असलेला केक देखील कापण्यात आला.

Chhagan Bhujbal On Mahayuti Seat Sharing
नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार? छगन भुजबळांचे सूचक विधान; म्हणाले, “महायुतीतील प्रत्येक पक्षाला ही जागा…”
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Ajit Pawar and Sharad Pawar
लोकजागर- विभाजितांची ‘हतबलता’!
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आणखी वाचा- “लगेच गुडघ्याला बाशिंग बांधायचं..”, अजित पवारांच्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही कानपिचक्या! ‘त्या’ प्रकाराचा केला उल्लेख!

भाजपचा फसवा विकास आहे. गेल्या आठ वर्षांत ‘अच्छे दिन’च्या नावाखाली भारताच्या जनतेला ‘एप्रिल फूल’ केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी, महागाईने जनतेला बेजार केले. अशी परिस्थिती आजवरच्या भारताच्या इतिहासात कधीच नव्हती. आता तर जनता सुद्धा भाजपच्या या अच्छे दिन वर ‘आमचे पुराने दिनच वापस करा’ असे बोलू लागली आहे, असे शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले.

माजी नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, शाम लांडे, कार्याध्यक्ष फजल शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष उमेश काटे, विनायक रणसुभे, दीपक साकोरे, राहुल पवार, उपाध्यक्ष मंगेश भुजबळकर, राजेंद्र थोरात, विकास कांबळे, मेघराज लोखंडे, शाहिद शेख, संतोष निसरगंध, संदिपान झोंबाडे, युसूफ कुरेशी, अविनाश गायकवाड, दीपक अंकुश, इरफान शेख, शाहिद इनामदार आझर आवटी, मुवाज मुजावर, महेश यादव उपस्थित होते.