मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात सुरू असलेल्या पुलाच्या कामांची केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी (३० सप्टेंबर) हवाई पाहणी करणार आहेत. गडकरी यांनी यापूर्वी दौऱ्यात चांदणी चौकात प्रत्यक्ष पाहणी केली होती.

चांगली चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरण केले जात आहे त्यासाठी जुना पूल पाडला जाणार आहे. शनिवारी मध्यरात्री हा पूल स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त केला जाणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान गडकरी आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत चाकण येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी साडेचार वाजता रावेत ते चांदणी चौक असा हवाई प्रवास करत राष्ट्रीय महामार्गाची त्यानंतर चांदणी चौकात सुरू असलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.