पिंपरी: अनधिकृत व्यवसायांमुळे पवना, इंद्रायणी नद्यांचे पात्र प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नदीच्या पात्राजवळील अनधिकृत व्यवसायांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात येतील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या नदी प्रदूषणाबाबत आमदार महेश लांडगे, दिलीप मोहिते, अश्विनी जगताप यांनी विधीमंडळात आवाज उठविला. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील पवना आणि इंद्रायणी नदी क्षेत्रात होणारे प्रदूषण कमी करून नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचा विस्तृत आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल. येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

हेही वाचा… पिंपरी: प्रशासकीय राजवट सुसाट; विकास कामांवर करोडो रुपयांची उधळण!

पवना, इंद्रायणीनदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामासाठी निविदा काढण्यात येतील. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महापालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांना जोडणारी इंद्रायणी म्हणजे महाराष्ट्रातील पवित्र गंगा आहे. संपूर्ण देशभरातील भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेली ही इंद्रायणी आणि पिंपरी-चिंचवडची जीवनवाहिनी असलेली पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. या नद्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. – महेश लांडगे, आमदार