पिंपरी- चिंचवड : “मम्मी मी मोबाईल फोडून टाकतो. पुरावा राहणार नाही. मला मरायचं आहे….मी विष प्यायलो आहे. मी लोकेशन पाठवलं आहे. माझा मृतदेह घेऊन जा…” अशा आशयाची सुसाईड ऑडिओ मम्मी (आई) ला पाठवून १८ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत अस आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. ही आत्महत्या नैराश्यातून केल्याचं देहूरोड पोलिसांचं म्हणणं आहे.

१७ जून रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात संजयकुमार बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला आहे. मृतदेहाच्या जवळ विषारी औषधाची बाटली आढळली आहे. संजयकुमार ने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. तस शवविच्छेदन अहवालात म्हटल आहे.

संजयकुमार पिंपरी- चिंचवड परिसरात कुटुंबासह राहतो. आई- वडील आणि दोन बहिणी अस त्याच कुटुंब आहे. संजयकुमारच बहिणींवर विशेष प्रेम होत. आत्महत्यापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये बहिणींची चिंता व्यक्त केली असून त्यांना उच्चशिक्षित करा अशी विनंती आई – वडिलांना केली आहे.

संजयकुमार हा नैराश्यात असल्याचं व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. आत्महत्या करणाऱ्या संजयकुमार ने विषारी औषध हे ऑनलाइन मागवलं होत. त्यानंतर च त्याने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. आत्महत्यापूर्वी केलेल्या ऑडिओमध्ये विषारी औषध प्राशन केल्याचं त्याने आई ला सांगितलं आहे. ऑडीओ आणि व्हिडिओ असे दोन क्लिप पोलिसांना आढळल्या आहेत. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणला आहे?

“ज्या प्रमाणे इतर लोक मरतात तसा मी ही मरेल…..आणखी काही बोलायचं नाही…माझ्या आई- वडिलांना एवढंच सांगायचं आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला काही नकोय…,केवळ माझ्या बहिणीची चिंता आहे. याव्यतिरिक्त ह्या जगात कुणाची चिंता नाही. दोन्ही बहिणींची चिंता आहे. त्यांना काही झालं नाही पाहिजे. त्यांच पालनपोषण चांगल व्हायला हवं. सुशिक्षित होऊन पुढे गेल्या पाहिजेत. माझं आयुष्य आता काही कामाच नाही.”