पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे. चिंचवड मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केलेले आणि एकदा विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्याबाबतचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जगताप कुटुंबियांना पत्र पाठवून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

PM Modi letter Laxman Jagtap family

हेही वाचा – “किती नेते आले-गेले, संभाजी महाराजांची धर्मवीर उपाधी…” भाजपच्या शहराध्यक्षांची अजित पवारांवर टीका

Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी
Sunetra pawar, Ajit Pawar,
अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना
Lok Sabha Election 2024 Roadshow of Rahul Gandhi and Priyanka Gandhi in Pune
‘पुण्या’साठी राहुल, प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्याही सभा
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत

हेही वाचा – पुणे : एमएनजीएलच्या गॅस वाहिनीला पुन्हा आग, सिंहगड रस्त्यानंतर खराडीतील घटना; गॅस पुरवठा विस्कळीत

लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दुःख झाले. या कठीण काळात माझ्या संवेदना जगताप कुटुंबियांसोबत आहेत. सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे लक्ष्मणभाऊ जमिनीशी जुळलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले. पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या निधनाने भाजपा आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. लक्ष्मण जगताप हे आपल्या परिवारासाठी मजबूत आधार आणि प्रेरणास्रोत होते. ते आज या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची जीवनमुल्ये जगताप कुटुंबासोबत कायम राहतील, असे मोदी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांना पत्र पाठवून सांत्वन केले आहे.