पिंपरी: ठेकेदारासोबत आलेल्या एकाने परवानगीविना दालनात घुसून  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या मुख्य  अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १६ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास आकुर्डीतील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात  घडली.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण, आजपर्यंत ३३ कारवाया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी अशोक मारूतीराव भालकर  (वय ५५, रा.शिवाजीनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामचंद्र जगताप (वय ४५, पूर्णनाव व पत्ता समजू शकला नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भालकर हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात मुख्य  अभियंता या पदावर कार्यरत आहेत. १६ मार्च रोजी त्यांच्या दालनात बैठक सुरू होती. बैठक संपत असताना मुख्य ठेकेदार कुणाल भोसले यांच्या सोबत आलेला आरोपी रामचंद्र हा परवानगीविना दालनात घुसला. भालकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तुम्हाला बघून घेतो असा आरडाओरडा करून गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.