श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टचे यंदाचे १३१ वे वर्ष आहे; तर यंदा दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती गणाधीश रथामधून दुपारी ४ वाजता विराजमान होऊन लक्ष्मी रोड मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील आकर्षक विद्युतरोषणाईचा रथ तयार करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा >>> नदीपात्र, कालव्यात मूर्ती विसर्जनाला मनाई… जाणून घ्या फिरत्या हौदांची ठिकाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी माणिक चव्हाण म्हणाले की, श्री गणाधीश रथावर आठ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघणार आहेत. भगवान शंकरांच्या आठ गणांच्या मूर्ती रथावर असणार आहेत. त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २१ फूट इतकी आहे. रथावर एक मुख्य कळस बसविण्यात आला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत. आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरून केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल लेझिम पथक, सनई चौघडा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.