पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभागातर्फे रविवारी ४० वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) सुरळीत पार पडली. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८२ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील विद्यापीठ, महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सेट परीक्षा आयोजित करण्यात येते. त्यानुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि गोवा अशा एकूण १८ शहरांमधील २५६ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज केलेल्या १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांपैकी ९० हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कला, विज्ञान, वाणिज्य, सामाजिक शास्त्र, विधी, व्यवस्थापन शिक्षण आणि शारीरिक शिक्षण अशा विविध शाखांमधील एकूण ३२ विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली.