पुणे : पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. टर्मिनलच्या चाचणी पूर्ण करून ते १५ एप्रिलला सुरू करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे नियोजन होते. मात्र, हवाई वाहतूक सुरक्षा विभागाची (बीसीएएस) मंजुरी न मिळाल्याने नवीन टर्मिनल सुरू करता येत नसल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या विलंबामुळे पुणेकर हवाई प्रवाशांना जुन्या टर्मिनलवरील गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० मार्चला दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. नवीन टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर लवकरात लवकर चाचण्या पूर्ण करून ते सुरू करावे, अशी सूचना त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. विमानतळ प्राधिकरणाने १ एप्रिलपासून नवीन टर्मिनल सुरू करण्याचे नियोजन केले होते. हे नियोजन नंतर १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले. प्रत्यक्षात १५ एप्रिललाही नवीन टर्मिनल प्रवाशांसाठी सुरू होणार नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून तांत्रिक कारणे दिली जात आहेत.

Murlidhar Mohol - Ravindra Dhangeka
Pune Accident : “दोन उद्ध्वस्त कुटुंबांचे अश्रू पुसायचे सोडून बिल्डरची बाजू घेताय?” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला
Police Commissioner Amitesh Kumar porsche car crash
Pune Car Crash : अल्पवयीन नव्हे, आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवणार? आयुक्तांनी सांगितलं पोलिसांचं पुढचं नियोजन
Marathi Joke On Husband Wife
हास्यतरंग : बायकोला पाहिजे पगार?
loksatta chaturang love boyfriend girlfriend chatting flirting College
सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!
Marathi Joke
हास्यतरंग : बसमध्ये बसलो…
Marathi Joke On Toothpaste
हास्यतरंग : टूथपेस्ट आहे का?
sitechi gosht aani itar katha, Aruna Dhere, Aruna Dhere s selected stories, Vandana Bokil Kulkarni, new marathi book, aruna dhere story book, marathi book, lokrang article,
‘समजुतीच्या काठाशी…’
Marathi Joke On Pappu And Relatives
हास्यतरंग : फरसाण आणि नातेवाईक…

हेही वाचा: गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन टर्मिनलवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव हवाई वाहतूक सुरक्षा विभागाकडे (बीसीएएस) पाठविण्यात आला आहे. बीसीएएसकडून सुरक्षाविषयक मंजुरी अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाला मिळालेली नाही. याचबरोबर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) २३१ अतिरिक्त जवान नवीन टर्मिनलसाठी तैनात करावे लागणार आहेत. त्यालाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे चाचण्या पूर्ण होऊनही नवीन टर्मिनल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जुन्या टर्मिनलवरील गर्दी इतर गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. याचबरोबर नवीन टर्मिनल सुरू होत नसल्याने जुन्या टर्मिनलचे नूतनीकरण लांबणीवर पडत आहे.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. हवाई वाहतूक सुरक्षा विभागाकडे सुरक्षाविषयक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून त्याची तपासणी सुरू असून, लवकरच नवीन टर्मिनल सुरू करण्यास मंजुरी मिळेल, अशी आशा आहे.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कधी सुरू होणार आहे? सरकार यासाठी पुण्यातील मतदानाच्या आधीच्या आठवड्यातील मुहूर्त काढून त्याचा प्रचारासाठी वापर करणार आहे का? खराब प्रशासनाचा हा नमुना आहे.

जयदीप राजहंस, प्रवासी

हेही वाचा: पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

असे आहे नवीन टर्मिनल… एकूण क्षेत्रफळ : ५२ हजार चौरस मीटर

तासाला प्रवासी क्षमता : ३ हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : ९० लाख
वाहनतळ क्षमता : १ हजार मोटारी

प्रवासी लिफ्ट : १५
सरकते जिने : ८

चेक-इन काऊंटर : ३४ एकूण खर्च – ४७५ कोटी रुपये

हेही वाचा: सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती

नवीन टर्मिनल कशामुळे अडले…

  • हवाई वाहतूक सुरक्षा विभागाची मंजुरी
  • अतिरिक्त २३१ सीआयएसएफ जवानांची नियुक्ती
  • खानपान सेवा आणि दुकाने सुरू करण्यास परवानगी