पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्हय़ातील पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभरातील महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याच दरम्यान पुण्यातील 27 वर्षीय महिलेला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याची घटना घडली आहे.

पती मिलिंद गायकवाड, सासरे दिनकर गायकवाड, सासू सखूबाई गायकवाड, नणंद अस्मिता गायकवाड, बबिता राजमाने आणि सुजाता वाघमारे या सहा जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात राहणार्‍या एका तरुणीचे 2022 मध्ये सोलापूर येथील मिलिंद गायकवाड यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्या महिलेला काहींना काही कारणावरून सासरच्या मंडळींकडून त्रास देण्याचा प्रकार सुरूच होता.त्याच दरम्यान त्या महिलेला मुलगी झाली. मुलगी झाल्याने आरोपी पती मिलिंद सह सासरे,सासू आणि नणंद यांनी पीडित महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास देत राहिले.या त्रासाला कंटाळून फिर्यादी या हडपसर येथे माहेरी आल्यानंतर त्यांच्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर आमच्याकडे पती मिलिंद गायकवाड,सासरे दिनकर गायकवाड,सासू सखूबाई गायकवाड, नणंद अस्मिता गायकवाड,बबिता राजमाने आणि सुजाता वाघमारे या सहा जणांविरोधात तक्रार दिली. त्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.