नशा करताना हटकल्याने अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. या प्रकरणी पाच अल्पवयी मुलांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा- मद्यपी मुलाकडून आईवर चाकूने हल्ला ; लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीमधील घटना

नशा करताना हटकले म्हणून हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदेश सुरेश सोनवणे (वय ३०, रा. महादेवनगर, धायरी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत सोनवणे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुले सोनवणे यांच्या ओळखीची आहेत. ती नशा करत असल्याचे सोनवणे यांनी पाहिले होते. त्यांनी अल्पवयीन मुलांना हटकले होते. त्यामुळे अल्पवयीन मुले सोनवणे यांच्यावर चिडून होती. सोनवणे धायरी परिसरातून जात होते. त्या वेळी एका मुलाने काय रे दादा मला ओळखतो का? अशी विचारणा केली. अल्पवयीन मुलगा आणि साथीदारांनी सोनवणे यांच्यावर कोयत्याने वार केला. अल्पवयीन मुलांनी परिसरात दहशत माजविली. या प्रकरणी पोालिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत.