scorecardresearch

Premium

टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी

गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली.

tet malpractice, tet exam scam, teacher's recruitment process, opportunity for candidates who have malpracticed in tet exam
टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी (संग्रहित छायाचित्र)

पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २०२२ ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्याची संधी दिली जाणार असून, पवित्र संकेतस्थळावर नोंदणीसाठी शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१८ आणि २०१९ मध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नऊ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रतिबंधित केले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ ला प्रविष्ट होता येणार नाही असा निर्णय दिला होता. त्यामुळे या उमेदवारांना पवित्र संकेतस्थळावरील शिक्षक भरती नोंदणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नव्हते.

Sunil Tatkare Sharad Pawar Ajit Pawar
“बंडखोर आमदारांना तत्काळ अपात्र करा”, शरद पवार गटाच्या मागणीवर सुनील तटकरे म्हणाले…
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
Sharad Pawar Ajit Pawar Rohit Pawar
“हो आम्ही पाळण्यात आहोत, पण…”, शरद पवारांचा उल्लेख करत रोहित पवारांचं अजित पवार गटाला प्रत्युत्तर, म्हणाले…
thackeray group express doubt on disqualification petitions hearing
विधानपरिषदेतील सेना आमदारांविरोधातील याचिका सुनावणीत संदिग्धता; ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा

हेही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध आणि तरुणी गर्भवती होताच…

मात्र, उच्च न्यायालयाने संबंधित उमेदवारांकडून आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री समन्वयक अधिकाऱ्यांनी केल्यानंतर स्व-प्रमाणन करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून पात्रता निश्चित करावयाची कार्यवाही समन्वयक अधिकारी यांच्याकडून होणार आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ विचारात घेता स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली.

हेही वाचा : मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही – सुप्रिया सुळे

प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय

टीईटी परीक्षांत गैरप्रकार केल्यामुळे प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या आदेशानुसार स्व-प्रमाणनाची संधी देत पदभरती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. मात्र गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune opportunity in teachers recruitment process given to candidates who have malpracticed in tet exam pune print news ccp 14 css

First published on: 23-09-2023 at 14:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×