पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली काही दिवसांपूर्वी घडली होती. ती चिमुरडी रात्री दीड वाजता पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून बेपत्ता झाली होती. त्यानंतर नजीकच असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात त्या चिमुरडीचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदनानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी आता मयत चिमुकलीच्या चुलत्याला बेड्या ठोवण्यात आल्या आहेत.
आरोपी चुलता हा घटनेच्या दिवशी रात्री १०:३० वाजल्यापासून १ वाजेपर्यंत अश्लिल चित्रपट पहात होता. त्यानंतर त्याने आपल्या पुतणीला राहत्या घरातून उचलून घेऊन जाऊन घराशेजारी नेले आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैगिक अत्याचार केले. त्यानंतर ती आवाज करत असल्याने तिचे तोंड दाबून गळा आवळून त्या नराधमाने तिचा खून केला. तपासाअंती सांगवी पोलिसांनी सदर नराधमाला जेरबंद केले आहे. दरम्यान, त्याच्या मोबाइमध्ये अश्लिल चित्रफिती आढळल्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
चिमुरडी बेपत्ता झाल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी तिचा शोध सुरु केला होता. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले. सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि या मुलीचे आई-वडील मुलीचा शोध घेत होते. अखेरीस मिलिट्री कॅम्पची भिंतीलगत असलेल्या कंपाउंडच्या आत पाण्याच्या खड्ड्यात या मुलीचा मृतदेह पहटेच्या सुमारास सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले होते.