‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने हे सर्क्युलर पाठवले गेले आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होते. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.

female police attacked in police station with sharp blade in ulhasnagar
उल्हासनगरमध्ये महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
atrocity case registered against doctor after threatening and abusing pune rpi a chief parashuram wadekar
रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी – डॉक्टरविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा
police registered case for threat call of planted bomb in haji ali dargah office
हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा
Raid in Hookah Parlor Kondhwa,
कोंढव्यात मॅश हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा
women and her brother in custody for abused Police constable at police station
पोलीस चौकीत पोलीस शिपायाला शिवीगाळ; बहीण-भाऊ अटकेत
cop shoots wife dead in nanded district over minor dispute
पत्नीचा गोळी झाडून खून केल्यानंतर पोलीस कर्मचारी ठाण्यात हजर
Gym Owner Killed in Delhi
Gym Owner Murder : दिल्लीतल्या जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या, लॉरेन्स बिश्नोई गँगचं ‘हे’ कनेक्शन समोर

याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील ३४ कोटीपर्यंत थकबाकी आहे. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी हे लुक आउट सर्क्युलर जारी केलेलं आहे.

३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटिस पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील पाठवलेलं आहे.  मात्र, लुकआट सर्क्युलर जारी होणं म्हणजे आरोपी आहे असं होत नाही. तरी देखील या लुकआउट सर्क्युलरवर आता राणे कुटुंबियांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुणे गुन्हे शाखा आयुक्तांचं असं म्हणणं आहे की, आमच्याकडे तक्रार आली होती व त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर लुकआउट सर्क्युलर जारी केलं गेलं आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे व नियमाप्रमाणे जी थकबाकी आहे ती पाहता डीएचएफएलकडून तक्रार करण्यात आली होती.