पुणे : रेल्वेकडून प्रवाशांसोबत प्राण्यांची वाहतूक केली जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी पुणे रेल्वे स्थानकातून सुमारे सहा हजार पाळीव प्राण्यांची वाहतूक झाली. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मिळून सुमारे सव्वाहजार प्राण्यांची वाहतूक झाली. यात सर्वाधिक संख्या कुत्र्यांची असून, त्याखालोखाल मांजरांची संख्या आहे.

अनेकदा प्रवासी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत रेल्वेने प्रवास करतात. अशा वेळी गाडी सुटण्याच्या दोन तास आधी स्थानकावर पोहोचून त्यांना पाळीव प्राण्यांची नोंदणी करावी लागते. पाळीव प्राण्यांची वाहतूक सामानाच्या डब्यातून प्रामुख्याने केली जाते. तिथे पाळीव प्राण्यांसाठीचे पिंजरे असतात आणि त्यातून या प्राण्यांची वाहतूक होते. याशिवाय प्रवासी पाळीव प्राण्यांना सोबत घेऊनही प्रवास करू शकतात. यासाठी त्यांना वातानुकूलित प्रथम श्रेणीतील डब्यातून प्रवास करावा लागतो. यासाठी खर्च अधिक असल्याने आणि प्रवासी सामानाच्या डब्यातून आपल्या प्राण्यांची वाहतूक करण्यास पसंती देतात.

pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
a woman stole from a another woman purse now the video is going viral on social media
“काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या’; दुकानात आल्या अन् क्षणात पर्स चोरी करुन निघाल्या; पाहा Video
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल

हेही वाचा…पुण्यात घरफोड्या करणारे मुंबईतील चोरटे गजाआड

पुणे रेल्वे स्थानकातून २०२३ मध्ये एकूण पाच हजार ९२० पाळीव प्राण्यांची वाहतूक झाली. त्यात तीन हजार ४०९ कुत्रे, ६४४ मांजरे, ५१४ शेळ्या आणि एक हजार ३५३ कोंबड्यांचा समावेश आहे. या पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीतून रेल्वेला एकूण १० लाख ९१ हजार रुपयांचा महसूल मिळाला. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एकूण एक हजार २३९ पाळीव प्राण्यांची वाहतूक झाली. त्यात ७०६ कुत्रे, १०८ मांजरे, ३३६ कोंबड्या आणि ८९ शेळ्यांचा समावेश आहे. यंदा या प्राण्यांच्या वाहतुकीतून रेल्वेला एक लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

नोंदणी कशी कराल?

पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीसाठी नोंदणी ऑनलाइन करता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना प्रवाशाला त्याच्या पाळीव प्राण्याचे तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आणि पशुवैद्यकीय डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यानंतर त्या प्राण्याची नोंद केली जाते. पाळीव प्राण्याच्या वाहतुकीचे शुल्क वजन, अंतर आणि गाडीचा प्रकार यावर अवलंबून असते. पुण्याहून दिल्लीला कुत्रा नेण्यासाठीचे शुल्क सुमारे ८०० रुपये आहे.

हेही वाचा…लोणावळ्यात पॉर्न व्हिडीओ तयार करणारे टोळके गजाआड, अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करत होते व्हिडीओ

पाळीव प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या दोन तास आधी येऊन पार्सल विभागात नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी झाल्यानंतर सामानाच्या डब्यात असलेल्या पिंजऱ्यातून या पाळीव प्राण्याची वाहतूक केली जाते. – उदय तुपे, मुख्य पार्सल निरीक्षक, पुणे रेल्वे स्थानक