पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी जलसंपदा विभागाकडून पावसाची नोंद करण्यात आली. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही येवा सुरू झालेला नसून, चारही धरणांत मिळून ५.५४ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहर आणि परिसराबरोबरच बुधवारी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. खडकवासला धरण परिसरात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १८ मिलिमीटर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३ मिमी, वरसगाव धरण परिसरात १४, तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नऊ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चारही धरणांतील पाणीसाठा ५.५४ टीएमसी एवढा असून, धरणे १९ टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये ४.६९ टीएमसी पाणीसाठा होता. त्यानुसार यंदा हा पाणीसाठा ०.८५ टीएमसी एवढा जास्त असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.