पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली असुन या आत्महत्ये मागील कारण अद्याप समजू शकले नाही.

सचिन हरिश्चंद्र सुर्वे (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सुर्वे हे खडक पोलीस स्टेशन येथे सेवेत होते. शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीमधील शिवनेरी बिल्डींगमध्ये सचिन सुर्वे हे राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा हे दोघेजण गावी गेले होते. त्याच दरम्यान शुक्रवारी सचिन सुर्वे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आमची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सचिन सुर्वे यांना मृत घोषित केले. तसेच सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.