पुणे : पुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला आहे. हा मार्ग एकूण २८० किलोमीटरचा असून, त्यासाठी ४ हजार ८१९ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. आतापर्यंत यातील ५० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील या मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे.पुणे मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे १५५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. यात पुणे-शिंदवणे, अंबाले-वाल्हा, लोणंद-आदरकी, सातारा-कोरेगाव, शेणोली-नांद्रे या दरम्यानच्या मार्गाचा समावेश आहे. सध्या उरलेल्या १२५ किलोमीटरचे काम वेगाने सुरू आहे.

त्यात शिंदवणे-अंबाले, वाल्हा-लोणंद, आदरकी-पळशी, जरंडेश्वर-सातारा, कोरेगाव-शेणोली, नांद्रे-मिरज या दरम्याच्या मार्गाचा समावेश आहे.लोहमार्ग दुहेकरणामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. याचबरोबर एका गाडीसाठी इतर गाड्या थांबवून ठेवण्याचेही प्रकार कमी होतील. त्यामुळे पुणे ते मिरज हा रेल्वे प्रवास कमी वेळात करणे शक्य होणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.रामदास भिसे यांनी दिली.

हेही वाचा >>>पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामाला तब्बल सात वर्षांचा कालावधी

पुणे-मिरज लोहमार्ग दुहेरीकरणाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले. हे काम अद्याप सात वर्षांत पूर्ण झाले नसून, डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या लोहमार्ग डोंगराळ भागातून जात असल्याने कामाचा वेग कमी आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी जास्त मोबदला मागितल्यामुळे भूसंपादनाचा प्रक्रिया रखडली होती. आता या कामाला वेग आला असला तरी हे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे.