अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एकाविरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी ओंकार विनोद आल्हाट (रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेच्या १६ वर्षीय मुलीला आल्हाटने जाळ्यात ओढले. तिला फूस लावून पळवून नेले. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ही बाब पीडीत मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आरोपी आल्हाट विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.