कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल ( रविवारी ) मतदान पार पडलं. अवघ्या राज्याचं या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. पण, मतदानानंतरही येथील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवारी ( २५ फेब्रुवारी ) कसबा पेठेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता सुरु असताना कसबा गणपती समोर उपोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : विधिमंडळातील ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था, आजारी बाळ अन् डोळ्यात अश्रू, सरोज अहिरेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या…

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं की, “निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ८ वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही पोलिसांच्या उपस्थितीत फिरत होते. माझ्यावर गुन्हा दाखल केला, मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. हा पक्षपातीपणा कशा करायला हवा.”

हेही वाचा : “राज्यातील सरकार कसाबी प्रवृत्तीचं, या सरकारला लाज, लज्जा…”; हिरकणी कक्षातील दुरावस्थेवरून अमोल मिटकरी आक्रमक

“मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. पण, निवडणूक यंत्रणा ही भाजपाचं कार्यालय झालं आहे. हेमंत रासनेंनी म्हटलं कसबा हा भाजपाचा गढ आहे. मात्र, हा जनतेचा गढ आहे. ही लढाई धनशक्ती आणि जनशक्तीची होती. जनशक्तीच्या मागे जनता होती. धनशक्तीच्या मागे ज्यांनी पैसे घेतले, ते होते. काही लोकांनी पैसे घेतले आणि मत धंगेकरांना देणार असं सांगितलं. परंतु, १५ ते २० हजार मतांनी माझा विजय होणार आहे,” असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरांना दिलं”, रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान; गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाच वाजेपर्यंत प्रचार संपला पाहिजे. पण, मुख्यमंत्र्यांचा पाच वाजून ७ मिनीटांनी भाषण झालं. त्यावर निवडणूक आयोगामार्फत काहीच भूमिका मांडली गेली नाही किंवा मुख्यमंत्र्यांना नोटीस बजविण्यात आली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांविरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाणार आहे,” असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.