Premium

पुणे: शनिवार पेठेत शाळेच्या आवारात चंदनचोरी

शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या आवारात असलेल्या चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

sandalwood theft
शनिवार पेठेत शाळेच्या आवारात चंदनचोरी ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पुणे : शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या आवारात असलेल्या चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत आकाश भेगडे (वय ३१, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. भेगडे यांच्या सिक्युरिटी एजन्सीकडून शाळा, सोसायटी, खासगी कंपन्यांंना सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिले जातात. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा परिसरात सुरक्षारक्षक सुमित कुमार काम पाहत होता. मध्यरात्री सुरक्षारक्षाकाची नजर चुकवून चोरटे शाळेच्या आवारात शिरले. मुख्याध्यापिका कार्यालयाजवळ असलेल्या शाळेच्या आवारातील चंदनाचा झाडाचा बुंधा कापून चोरटे पसार झाले. चंदनचोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस कर्मचारी अतुल साळवे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sandalwood stolen from school premises in shaniwar peth pune print news rbk 25 amy