उच्च शिक्षण विभागाचे निर्देश

पुणे : राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांना तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करावी लागणार आहे. त्या संदर्भातील निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी दिले आहेत.  तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने २०१९ मध्ये राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी राज्यातील राज्यातील अकृषी, अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात वावरताना वेगवेगळय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ सर्वसामान्य विद्यार्थी तृतीयपंथी विद्यार्थ्यांशी मैत्रीभावना बाळगताना संकुचित भावना दर्शवतात, महाविद्यालयातील वसतिगृह वापराताना त्यांना अपमानित केले जाते. तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांनी त्यांना वेगळी वागणूक न देता सर्वसमावेशक पद्धतीचा अवलंब करावा. त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करावी. जेणेकरून त्यांना वैयक्तिक अपमान, अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही आणि शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरवणे शक्य होईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.