विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय क्षमता वाढीसाठी सेतू अभ्यासक्रम

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात सोमवारी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले.

पुणे : गेल्यावर्षी करोना काळातील ऑनलाइन शिक्षणामध्ये दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षांतील विषयनिहाय क्षमता संपादनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सेतू अभ्यासक्रम विकसित के ला आहे. मराठी, उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयांतील महत्त्वाच्या क्षमतांचा अभ्यासक्रमात समावेश असून, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम १ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान पूर्ण करावा लागणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रमात सोमवारी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. राज्यमंत्री बच्चू कडू, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड, डॉ. कमलादेवी आवटे आदी या वेळी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाल्या की, गेल्या शैक्षणिक वर्षांत विविध माध्यमाद्वारे शिक्षणासाठीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू न शकल्याने विद्यार्थ्यांना विषयनिहाय क्षमता संपादित करण्यात अडचणी निर्माण झालेल्या असू शकतात. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षांची उजळणी होऊन मागच्या इयत्तेतील क्षमता आणि नव्या इयत्तेतील क्षमतांचा सेतू या अभ्यासक्रमातून साधला जाईल.

सेतू अभ्यासक्रमाद्वारे प्रत्येक वंचित घटकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शाळा बंद असतानाही प्रत्येक मूल शिकत राहील आणि आपल्या इयत्तांच्या क्षमता पूर्ण करेल, असे बच्चू कडू म्हणाले.

कृतिपत्रिका आणि तीन चाचण्या

सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या विषयनिहाय कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्रांच्या मदतीने सोडवायच्या आहेत.  शिक्षकांना या कृतिपत्रिकांचा अंतर्गत मूल्यमापनासाठीही उपयोग होईल. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या तीन चाचण्या ऑनलाइन  किं वा ऑफलाइन पद्धतीने सोडवायच्या आहेत. शिक्षकांनी चाचण्यांच्या गुणांची नोंद ठेवायची आहे. सेतूअभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच संबंधित इयत्तेच्या अभ्यासक्रमाची अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करावी.  सेतू अभ्यासक्रम http://www.maa.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे एससीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Setu course subject wise capacity building students ssh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या