केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्याने आज शरद पवार गटाने ठिकठिकाणी आंदोलन केली. पिंपरी- चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शरद पवार गटाने निवडणूक आयोगा विरोधात घोषणाबाजी करत मुंडन आंदोलन केले. आमचा पक्ष आमचं चिन्ह शरद गोविंदराव पवार अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कुणाची आणि चिन्ह कुणाचं यावर निकाल जाहीर केला.

हेही वाचा >>> पुण्यात शरद पवार गटाच्या महिलांकडून, गली गली मे शोर है अजित पवार चोर है च्या घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाचे असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. यानंतर अवघ्या महाराष्ट्रातुन शरद पवार गट आणि विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली. याचे पडसाद पिंपरी- चिंचवड शहरात देखील उमटले असून निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंडन आंदोलन करण्यात आलं. भारतात लोकशाही राहिली आहे की नाही? असा प्रश्न यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या देशाचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, पळपुट्या अजित पवारांचे करायचं काय? खाली डोके वर पाय, अशा विविध घोषणा दिल्या. शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.