MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Passing Percentage : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. गेल्यावर्षी राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते.

One lakh women went missing in the state between 2019 and 2021
राज्यात २०१९ ते २०२१ या काळात एक लाख महिला बेपत्ता, त्यांचा शोध घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका
mumbai university marathi news
‘आयडॉल’च्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार
tuition fees, scheme, Government,
दर महिन्याला ६ ते १० हजार विद्यावेतन, सरकारची आणखी एक योजना
State Council of Educational Research and Training, Review of Online Attendance System, Irregularities in Student Registration, education, marathi news, student attendance,
विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्यात अनियमितता… कारण काय?
aicte council approved more than 5 thousand 500 institutes for bba bms bbm and bca courses
बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत किती संस्थांची नोंदणी?
04 new medical colleges likely to come up in maharashtra
राज्यात यंदा चार नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार ?
MPSC, mpsc skill test, mpsc latest news,
‘एमपीएससी’ची ‘टंकलेखन’ परीक्षा तांत्रिक गोंधळामुळे रद्द; उमेदवारांमध्ये संतापाची लाट…
Aditya Thackeray
“अडीच वर्ष सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का?”, लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला

हेही वाचा – “रुग्णवाहिका येतेय, मृतदेह अर्धा तास शवागृहात ठेवा, अश्विनी कोस्टाच्या पालकांची विनंती रुग्णालयाने धुडकावलेली”, काँग्रेसचा संताप

हेही वाचा – Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, अपघातानंतर वडिलांनी केला होता फॉरेन्सिक प्रमुखाला फोन

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की यंदा परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यासाठी २७१ भरारी पथके, महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली.