पुणे : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रांतील मंडळी भेट देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरतीदेखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्यदेखील केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात महागाई वाढली, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, तरुणांना रोजगार नाही. या सर्व बाबींवर उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. काल महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर होत होते. त्यावेळी खासदार कनीमोळी यांच्याविरोधात भाजपाच्या एका खासदाराने अपशब्द वापरले. ही बाब निषेधार्थ असून एका बाजूला महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होत आहे, तर दुसर्‍या बाजूला महिला खासदाराचा अपमान करण्याचे पाप भाजपा नेत्याने केले. यातून भाजपाची मानसिकता दिसून येते. त्यामुळे हे गणराया भाजपा नेत्यांना सुबुद्धी दे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा – देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद

हेही वाचा – पिंपरी : गणेश मंडळांच्या आरती…अजित पवार आणि रोहित पवार दाखविणार शक्ती!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात आणि राज्यात यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, हीच गणरायाकडे प्रार्थना करीत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.