शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. वर्षभरापूर्वी तडीपार गुंडाने एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
तनिष्क संतोष सोनवणे (वय २०, रा. बालाजी संकुल, आंबेगाव खुर्द, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोनवणे याच्या विरोधात गेल्या वर्षी एकाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. शहरातून तडीपार केल्यानंतर त्याने गुन्हा केला होता. गणेशोत्सवात भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी सोनवणे कात्रज भागात थांबल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा >>> पुणे : औंधमध्ये पादचारी ज्येष्ठाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू
पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, नरेंद्र महांगरे, सचिन गाडे, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे आदींनी ही कारवाई केली.