पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे जाहीर करण्यापलिकडे शिक्षण विभागाने काहीही केले नाही. अनधिकृत शाळांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, याकडे संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी आयुक्तांचे पत्राद्वारे लक्ष वेधले. अनधिकृत शाळांचा कारभार पालिकेच्या शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अनाधिकृत शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take action directors running illegal schools request municipal commissioner pune print news ysh
First published on: 15-09-2022 at 19:45 IST