पुणे : रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्यासाठी मागील काही दिवसांपासून पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यात लोहमार्गांची संख्या वाढविणे, ओव्हर हेड इक्विपमेंट नियमन, सिग्नलिंगचे काम, आणि तसेच इतर तांत्रिक कामे यांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण झाल्यामुळे पुणे विभागात रेल्वे गाड्यांचा कमाल वेग आता ताशी १०० वरून ११० किलोमीटरवर पोहोचला आहे.

मध्य रेल्वेकडून गाड्यांचा वेग वाढविण्याच्या दिशेने मागील काही वर्षांपासून पावले उचलली जात आहेत. प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी आणि त्यांना उत्तम सेवा प्रदान करता यावी यासाठी मध्य रेल्वे सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यात रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये लोहमार्गांची संख्या वाढविणे, ओव्हर हेड इक्विपमेंट नियमन, सिग्नलिंगचे काम आणि तसेच इतर तांत्रिक कामे यांचा समावेश आहे. याचबरोबर लोहमार्गांची देखभाल दर्जेदार पद्धतीने केली जात आहे. तसेच, जुन्या यंत्रणा बदलण्याचे कामही प्राधान्याने करण्यात येत आहे.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

हेही वाचा >>>२८ वर्षांची सेवा, ३५१ बक्षीस, अन् २३ प्रशस्तीपत्रक; पिंपरीतील ‘या’ पोलीस अधिकाऱ्याला जाहीर झाले राष्ट्रपती पदक

पुणे विभागात रेल्वे गाड्यांच्या कमाल वेगात वाढ करण्यात आली आहे. त्यात पुणे ते साताऱ्यादरम्यान रेल्वेचा वेग ताशी ११० किलोमीटर झाला आहे. तसेच सातारा ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर या दरम्यानही वेग ताशी ११० किलोमीटरवर पोहोचला आहे. सुरक्षेच्या सर्व बाबी तपासून आणि अधिकाऱ्यांनी संपूर्ण तांत्रिक तपासणी केल्यानंतरच रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ करण्यात आली आहे. गाड्यांचा वेग वाढल्याने त्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यात मदत होणार आहे. याचबरोबर प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

गाड्यांचा वेग वाढल्याने काय होणार…

– प्रवाशांसाठी अधिक जलद प्रवासाची सोय

– प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार

– गाड्यांचा वक्तशीरपणा वाढण्यास मदत

– गाड्यांची संख्या वाढविता येणे शक्य

– प्रवास वेगवान झाल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढणार