पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाविषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी आयोजित केलेल्या भोसरीतील ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२२’ या सायकल फेरीत २५ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

हेही वाचा- मोठी बातमी! मनसेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज?

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी पालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र अशा विविध संस्था-संघटनांसह शाळा-महाविद्यालयांच्या सहभागातून या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते फेरीचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, विक्रमवीर सायकलपटू प्रिती म्हस्के, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी पालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते.

हेही वाचा- राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने झालेली ही सायकल फेरी देशातील सर्वांत मोठी ठरली आहे. सायकलपटू एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले, ही उल्लेखनीय बाब आहे. प्रवीण तरडे म्हणाले, लोकांचा उत्साह आणि सहभाग पाहून रविवारची सकाळ संस्मरणीय झाली. संयोजन समितीचे प्रमुख डॉ. निलेश लोंढे म्हणाले, २५ हजाराहून अधिक नागरिक या फेरीत सहभागी झाले. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.