पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर आज पुन्हा एकदा दरड काढण्यासाठी दोन तासाचा ब्लॉग घेतला जाणार आहे. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी पूर्ण वाहतूक किवळे येथून जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळवण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली होती. धोकादायक दरड काढण्याचे काम आज घेण्यात येणाऱ्या ब्लॉक दरम्यान करण्यात येणार आहे.

पुणे- मुंबई द्रुतगतीवर गेल्या आठ दिवसांमध्ये दोन वेळेस दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी दहाच्या सुमारास आडोशी बोगद्याच्या जवळ दरड कोसळली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि शुक्रवारी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. धोकादायक दरड काढण्याचं काम दोन्ही वेळेस घेतलेल्या ब्लॉक दरम्यान करण्यात आलं.

हेही वाचा… कामे खोळंबली, वाहतुकीची कोंडी; सिंहगड रस्त्याची चाळण

हेही वाचा… समृध्दीवरील वाढते अपघात!; नागपूर ते पुणे रेल्वेगाड्या वाढविण्याची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरीकडे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कामशेत बोगद्याच्या जवळ दरड कोसळल्याने काही काळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, हीच धोकादायक दरड, माती आणि दगड काढण्यासाठी आज दुपारी दोन ते चार च्या दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकला अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.