लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाच्या २०२५-२६ या वर्षाच्या ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. फळाफुलांचे प्रदर्शन भरविणे, वृक्षांचे पुनर्रोपण, पिंजरे खरेदी व दुरुस्ती, वृक्षगणना, तार कुंपण देखभाल दुरुस्ती, गायरान व मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण तसेच संवर्धन, नर्सरी साहित्य खरेदी केले जाणार आहे.

महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाला वृक्षकर, वृक्षतोड, लाकूड विक्री, अनुदान, देणगी, झाडतोड खर्च वसुली, रोपे विक्री, विनापरवाना झाडे तोडल्याबाबत नागरिकांकडून वसूल केलेली तडजोड रक्कम, महापालिका सेवाशुल्क आदी बाबींच्या माध्यमातून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ६२ कोटी ४६ लाख दहा हजार ५०० रुपये जमा होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०२५-२६ या वर्षाचा ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांचा वृक्षसंवर्धन विभागाचा अर्थसंकल्प असणार आहे.

वृक्षसंवर्धन विभागाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील रक्कम विविध उपक्रम, विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्यालयीन खर्चासह फळाफुलांचे प्रदर्शन भरविणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, पिंजरे खरेदी व दुरुस्ती करणे, वृक्षगणना करणे, तार कुंपण देखभाल दुरुस्ती करणे, विविध उद्यानांची देखभाल दुरुस्ती करणे, गायरान व मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण तसेच संवर्धन करणे, नर्सरी साहित्य खरेदी करणे आदी कामांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किवळेत उद्यान

किवळे येथे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. कासारवाडी येथील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या कामाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे.